हुबळी शहरातील गदग रोडवर अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना सीसीबी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत मद्य आणि वाहनासह एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे मद्य आणि ५० हजार रुपये किमतीची ओम्नी गाडी जप्त केली. बालकृष्ण मिस्किन आणि रामकृष्ण अवटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सीसीबी पथकातील दानेश मांग, सुनील पांडे, एम. बी. धनिगोंड, एम. बी. पाटील आणि एम. बी. भजंत्री यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक बाबा, रूपसिंग राठोड आणि मच्छद उपस्थित होते.
याप्रकरणी केश्वापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांनी सीसीबी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.


Recent Comments