धारवाडमध्ये हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत विद्यागिरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ते मूळ मालकांना परत केले.

सीपीआय शिवयोगी लोहार यांच्या नेतृत्वाखाली विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शोधून काढलेले सहाही मोबाईल संबंधित मालकांकडे सुपूर्द केले. मोबाईल परत मिळाल्याने मालकांनी आनंद व्यक्त केला. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या कामाचे कौतुक केले.




Recent Comments