धारवाडमधील संगोळ्ळी रायण्णा नगर येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी विद्यागिरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
१९ नोव्हेंबर रोजी संगोळ्ळी रायण्णा नगर येथील मौनेश हंजगी हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली होती. याप्रकरणी त्यांनी विद्यागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा नोंदवून तपास सुरू केलेल्या पोलिसांनी काही दिवसांतच आरोपीला अटक केली.

हरीश पात्रोटी (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोने आणि १६ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


Recent Comments