hubali

अंजली अंबिगेर हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

Share

अंजली अंबिगेर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून, आरोपी गिरीश सावंत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हुबळी येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.

न्यायाधीश पल्लवी बी. आर. यांनी आरोपी गिरीश ऊर्फ विश्वनाथ सावंत याला जन्मठेप आणि ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. १५ मे २०२४ रोजी हुबळीतील वीरापूर ओणी येथे ही हत्या झाली होती. या घटनेत २० वर्षीय अंजली अंबिगेर हिचा खून करण्यात आला होता.

घरात झोपलेल्या अंजलीला उठवून आरोपीने चाकूने वार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविला होता. सीआयडीने तपास पूर्ण करून ४९४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात आता न्यायालयाने निकाल दिला.

Tags: