Bellary

ट्रान्सफॉर्मरवर काम करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Share

विजयनगर जिल्ह्यातील कूडलगी तालुक्यातील दिब्बदहळ्ळी येथे ट्रान्सफॉर्मरवरील झाडेझुडपे हटवताना विजेचा धक्का लागून एका रोजंदारी कामगाराचा मृत्यू झाला. वीजपुरवठा खंडित न करता काम सुरू केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.

अर्जुनचिन्नेनहळ्ळी येथील जी. बोरय्या वय ३८ हे ट्रान्सफॉर्मरवरील झाडेझुडपे आणि वेली हटवण्यासाठी चढले होते. यावेळी विजेचा धक्का बसल्याने त्यांचा ट्रान्सफॉर्मरवरच लटकलेल्या अवस्थेत मृत्यू झाला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांचा मृतदेह पूर्णपणे भाजला.

काम सुरू असताना जेस्कॉम अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुडेकोटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Tags: