अभिनेता चिक्कण्णा यांनी अभिनेता दर्शन यांची सध्या भेट घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘लक्ष्मीपुत्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होसपेटेत आले असताना अप्पू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
चिक्कण्णा यांनी प्रमुख भूमिका साकारलेला ‘लक्ष्मीपुत्र’ चित्रपट २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यानिमित्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते विजयनगर जिल्ह्यातील होसपेटेत आले होते. यावेळी त्यांनी अप्पू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. कन्नड चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी होसपेटेत येऊन अप्पू यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा असून, आपणही त्याच भावनेने येथे आल्याचे चिक्कण्णा यांनी सांगितले.

दरम्यान, चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी हत्या प्रकरणात कारागृहात असलेले अभिनेता दर्शन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर चिक्कण्णा यांनी सध्या दर्शन यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.


Recent Comments