धारवाड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचवण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नवलगुंद तालुक्यातील इब्राहिमपूर येथील शेतकऱ्याने पिके जगवण्यासाठी आता पाण्याच्या टँकरवर भिस्त ठेवली आहे.
पावसाअभावी शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्याला टँकरने पाणी आणून पिकांना द्यावे लागत आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पदरमोड करून टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पिके वाचवण्यासाठी पाण्याची व्यवस्था स्वतः करावी लागत आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.


Recent Comments