Belagavi

राकसकोपमध्ये मंदिर जीर्णोद्धारापूर्वी पाच वार पाळणार

Share

राकसकोप येथील श्री पंचराशी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारापूर्वी धार्मिक परंपरेनुसार पाच वार पाळण्यास सुरुवात झाली आहे.

या काळात बाहेरगावी राहणाऱ्या नातेवाईक व पाहुण्यांनी गावात येऊ नये, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी आजपासून पाच वार पाळले जाणार आहेत. पुढील दोन आठवड्यांत मंगळवार आणि शुक्रवार असे उर्वरित वार पाळल्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत गावातील धार्मिक परंपरा आणि नियमांचे पालन करण्यात येणार असल्याने बाहेरगावी राहणारे नातेवाईक, पाहुणे तसेच बेळगाव व परिसरातील गावाशी संबंधित नागरिकांनी राकसकोपमध्ये येणे टाळावे, असे आवाहन देवस्थान पंच कमिटी आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Tags: