हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, वाहतूक मार्गात बदल केल्याने हलगा सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्या सोयीसाठी महामार्गावरील खराब रस्त्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, बेळगावकडून येणारी वाहने हलगा गावच्या सर्व्हिस रोडवरून बागेवाडीच्या दिशेने वळविण्यात येत असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी आणि वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करावे, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.



Recent Comments