Chikkodi

चिकोडीत टिपू सुलतान जयंती साजरी

Share

कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्यातील टर्बाइन स्फोटप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी भारतीय कृषक समाजाने केली आहे. यासंदर्भात नेते सिद्धगौडा मोदगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

पाच दिवसांपूर्वी झालेल्या टर्बाइन स्फोटामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, ऊस गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत संघटनेने कारखान्याचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांच्यासह संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे.

कारखान्याचे जाणीवपूर्वक नुकसान करून स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी ऊस अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप सिद्धगौडा मोदगी यांनी केला. या प्रकरणाची विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुर्घटनेतील आर्थिक नुकसान संचालक मंडळाकडून वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Tags: