भूकमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १६ नव्या इंदिरा कॅन्टीनचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. कॅन्टीनमधील अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी आमदारांनी अचानक भेट देऊन तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

१९ नोव्हेंबर रोजी बंगळूर येथील जवाहरलाल नेहरू तारांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी १६ नव्या इंदिरा कॅन्टीनचे लोकार्पण केले. यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट इंदिरा कॅन्टीन पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तामिळनाडूच्या अम्मा कॅन्टीन संकल्पनेतून प्रेरणा घेऊन सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही योजना आज लाखो गरीब नागरिकांना आधार देत आहे, असे त्यांनी सांगितले. कॅन्टीनचे व्यवस्थापन आणि अन्नाची गुणवत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी आमदारांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.


यावेळी गांधी कुटुंबाशी असलेल्या संबंधांचा तसेच इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ आणि २० कलमी कार्यक्रमासारख्या महत्त्वपूर्ण योजना काँग्रेस सरकारने राबवल्याचे सांगितले. देशातील गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी भूकमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. अशा कर्तृत्ववान महिला नेत्याच्या नावाने इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.



Recent Comments