बेंगळुरू येथील विधानसौधमध्ये आयोजित पहिल्या कॉमनवेल्थ महिला खासदार आणि आमदारांच्या भारतीय प्रादेशिक संमेलनात बेळगाव ग्रामीणच्या आमदार व माजी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभाग नोंदवला. .

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशाच्या विविध भागांतील महिला खासदार आणि आमदार सहभागी झाल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत महिला नेतृत्व अधिक सक्षम करणे, राजकीय आणि विधिमंडळ संस्थांमधील महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे तसेच निर्णयप्रक्रियेत महिलांचा सक्रिय आणि अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित करणे, या विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे. महिलांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यास लोकशाही अधिक बळकट, समताधिष्ठित आणि सर्वसमावेशक होईल, हा या संमेलनामागील मुख्य उद्देश आहे.


या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील, कॉमनवेल्थ महिला संसद सदस्यांच्या भारतीय प्रादेशिक विभागाच्या अध्यक्षा डॉ. डी. पुरंदेश्वरी, विधानपरिषदेचे सभापती सलीम अहमद, उपसभापती डॉ. उमाश्री, विधानसभा उपाध्यक्ष मंकाळ वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनात सहभागी झाल्याबद्दल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी समाधान व्यक्त केले. महिला नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि लोकशाहीतील महिलांची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी अशी व्यासपीठे महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments