Belagavi

बेळगावात राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेला प्रारंभ

Share

बेळगाव येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत देश-विदेशातील १२०० हून अधिक स्केटर्स सहभागी झाले आहेत.

देशातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश आणि आखाती देशांमधील ९ देशांचे स्केटर्स या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकसह बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्यावर विविध स्पर्धा होणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी प्राचार्या स्फूर्ती यांनी आमदार अभय पाटील यांचा सत्कार केला. यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यक्ष डॉ. प्रेमानंद जाधव, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह बिरला स्कूलचे शिक्षक, कर्मचारी, स्केटर्स आणि पालक उपस्थित होते.

Tags: