Belagavi

आंतरराष्ट्रीय अश्वारूढ स्पर्धेत येळ्ळूरच्या जवानाचे घवघवीत यश

Share

जॉर्डन येथे झालेल्या विश्वचषक टेंट पेगिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावचे जवान रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत तीन कांस्यपदके मिळवली.

१२ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जॉर्डनमधील अकाबा शहरात झालेल्या आयटीपीएफ विश्वचषक टेंट पेगिंग स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक लान्स प्रकारात कांस्यपदक पटकावले. तसेच रिंग अँड पेग, लेमन अँड पेग आणि रिले या प्रकारांचा समावेश असलेल्या सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवले. लान्स आणि तलवार या प्रकारांचा समावेश असलेल्या वैयक्तिक सर्वांगीण स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली.

सांघिक सर्वांगीण स्पर्धेत भारतीय संघाने ४३६ गुणांसह पाचवे स्थान मिळवले. या कामगिरीत दिनेश कार्लेकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

Tags: