वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता वाहनचालकांनी काम बंद करून आंदोलन सुरू केले आहे. थकीत वेतन मिळेपर्यंत कामावर परतणार नसल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या स्वच्छता वाहनचालकांनी काम थांबवून शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमीजवळ कचरा वाहतूक करणारी सर्व वाहने रांगेत उभी केली आहेत. अनेक दिवसांपासून वेतन मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची व्यथा चालकांनी मांडली. प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत थकीत वेतन तातडीने जमा करण्याची मागणी त्यांनी केली.

थकीत वेतनाची रक्कम मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामावर रुजू होणार नसल्याचा इशाराही चालकांनी दिला आहे.


Recent Comments