hubali

अपहरण झालेल्या व्यक्तीची अवघ्या दोन तासांत सुखरूप सुटका; दोघांना अटक

Share

हुबळीत अपहरण झालेल्या व्यक्तीची अवघ्या दोन तासांत सुखरूप सुटका करण्यात गोकुळ रोड पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हुबळीतील गोकुळ रोडवरील सेंट्रल एक्साइज कॉलनी येथील रहिवासी सुरेश पुजारी (वय ३२) यांचे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याची माहिती मिळताच गोकुळ रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संगमेश दिदिगनाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. अवघ्या दोन तासांत सुरेश पुजारी यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या कारवाईत बेळगाव येथील शिवकुमार चंद्रशेखर हिरेमठ आणि बैलहोंगल तालुक्यातील गिरीयाळ गावचा मंजुनाथ अडिवेप्पा करडी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गोकुळ रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

या जलद कारवाईबद्दल निरीक्षक संगमेश दिदिगनाळ तसेच पोलीस कर्मचारी बसवराज बेळगावी, वसंत गुडिगेरी, सुनील लामाणी, चंद्रू हिरेमठ, रुद्रप्पा होरट्टी, धरेश बेंडिगेरी आणि मल्लारेड्डी बेन्नूर यांच्या कामगिरीचे हुबळी-धारवाड शहर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Tags: