hubali

हुबळीत बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्रीचा फसवणुकीचा प्रकार; मुख्य आरोपी अटकेत

Share

हुबळीत बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला हुबळी-धारवाड पोलिसांनी अटक केली आहे.

हुबळीतील उणकल परिसरात मूळ मालकी हक्काच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. त्याआधारे खुल्या भूखंडाची बेकायदेशीर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी विद्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणातील हुबळीच्या सेटलमेंट भागातील राघवेंद्र गोकाक याला अटक केली. याच पद्धतीने त्याने अनेक निष्पाप नागरिकांची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचे आरोपही होत आहेत. खुल्या भूखंडांवर डोळा ठेवून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे प्रकार समोर येत असल्याने पोलिसांनी अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. दरम्यान, आरोपी राघवेंद्र गोकाक याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Tags: