बेळगाव शहरातील रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राची सद्यस्थिती, विकासकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत बुडा अध्यक्ष तथा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

बैठकीत क्रेडाईच्या प्रतिनिधींनी रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध समस्या, विकासकामे राबवताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रक्रियात्मक अडथळ्यांची माहिती दिली. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी विविध सूचना आणि मते मांडली. विकास प्राधिकरण आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये समन्वय व सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे आसिफ सेठ यांनी सांगितले. विकासकामे पारदर्शक, सुव्यवस्थित आणि अनावश्यक विलंबाशिवाय पूर्ण होण्यासाठी अधिकारी व उद्योजकांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


शहराच्या विकासाला पूरक वातावरण निर्माण करणे, प्रक्रियात्मक अडथळे दूर करणे आणि आवश्यक निर्णय कालमर्यादेत घेणे यावर बैठकीत चर्चा झाली. बेळगाव शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देतानाच रिअल इस्टेट क्षेत्रातील समस्या समन्वयातून सोडवून जबाबदार विकासाला सहकार्य करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.


Recent Comments