राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऊस दरावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, खासदार जगदीश शेट्टर यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
ऊस उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर केला असला, तरी शेतकरी आंदोलकांनी प्रतिटन ५,५०० रुपये दराची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला आणि ऊस उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा म्हणून बेळगावची ओळख आहे. शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य आणि किफायतशीर दर देणे हे राज्य सरकारचे प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांमधील नाराजी कायम असून, परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे शेट्टर यांनी आवाहन केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देत केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य आणि निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आगामी काळात ऊस उत्पादकांना अधिक चांगला आणि योग्य दर मिळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments