Dharwad

धारवाड केडीपी बैठकीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मंत्री संतोष लाड, आमदार विनय कुलकर्णी संतापले

Share

धारवाड जिल्हा पंचायत सभागृहात पालकमंत्री संतोष लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केडीपी बैठकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

तहसीलदाराला लोकायुक्तांनी पकडल्याच्या घटनेवरून मंत्री संतोष लाड आणि आमदार विनय कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला.
लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मंत्री लाड यांनी दिला. लाच घेतल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर आणि हेस्कॉम अभियंता गुलजार यांच्यावर झालेल्या लोकायुक्त कारवाईचा उल्लेख करण्यात आला.

ग्रामीण पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी जगदीश पाटील यांच्यावरही आमदार विनय कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करत त्यांनी शासकीय कार्यालयांतील दलालीच्या प्रकारांवर कडक इशारा दिला.

Tags: