Khanapur

बळोगा येथील पारायण सोहळ्यात आमदार विठ्ठल हलगेकर यांची उपस्थिती

Share

खानापूर तालुक्यातील बळोगा येथे आयोजित पारायण सोहळ्यात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थित राहून देवाचे पूजन केले.

यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजातील नैतिक मूल्यांची जपणूक होण्यासोबतच भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होते, असे मत व्यक्त केले. या सोहळ्याला पारायण समितीचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Tags: