Khanapur

ओलमणीतील म्हैस चोरी प्रकरणी तिघांना अटक

Share

ओलमणी येथील शेतकऱ्याच्या दोन म्हशी रात्रीच्या वेळी चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे मिळवले. अखेर या चोरीप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले.

शेतकरी परशराम पवार यांच्या शेतातील १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी २३ ऑक्टोबरच्या रात्री चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी आणि उपनिरीक्षक सिद्रामप्पा उन्नद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भीमाप्पा पुजेरी, भरमाप्पा पुजेरी आणि यल्लाप्पा गुंडलगुप्पी या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन्ही म्हशी हस्तगत करून शेतकरी परशराम पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

Tags: