Khanapur

विद्यार्थ्यांनी चांगले-वाईट यातील फरक ओळखून भविष्य घडवावे : विरुपाक्ष पाटील

Share

खानापूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात महिला व बालविकास आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालविकास अकादमीचे सहसंचालक विरुपाक्ष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वृक्षाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिदशेत प्रेम आणि मौजमजेत वेळ न घालवता चांगले-वाईट यातील फरक ओळखावा. मन विचलित न होऊ देता भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला विरुपाक्ष पाटील यांनी दिला.

बालविकास अकादमीचे अध्यक्ष अडवेश इटगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा तसेच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या यशाचा दाखला देत विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन इटगी यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. ताबोजी, प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags: