बेंगळुरू येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘कृष्णा’ येथे गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांसोबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विशेष संवाद साधला. यावेळी महिलांनी योजनेमुळे स्वावलंबी झाल्याचे अनुभव सांगत स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू मुख्यमंत्र्यांना भेट दिल्या.


या संवाद कार्यक्रमाला गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा पद्मावती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तुषार गिरीनाथ, महिला व बालकल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. शमला इक्बाल, विभागाचे संचालक डॉ. महेश बाबू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





Recent Comments