State

धर्म आणि नीती टिकवण्यात धर्मगुरूंची भूमिका अनन्यसाधारण; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Share

बेंगळुरू येथील माता अमृतानंदमयी मठात आयोजित ब्रह्मस्थानम मंदिर उत्सव २०२६ चे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी समाजात धर्म आणि नीती टिकवण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

देशात आजही न्याय, नीती आणि धर्म टिकून राहण्यामागे माता अमृतानंदमयी यांच्यासारख्या धर्मगुरूंचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्नाटकच्या जनतेच्या वतीने माता अमृतानंदमयी यांचे स्वागत करत त्यांच्या समाजसेवेचेही कौतुक केले.

धर्म कोणताही असो, तत्त्व एकच; देव एकच, नावे अनेक; पूजा कोणतीही असो, भक्ती एकच आणि कर्म कोणतेही असो, निष्ठा एकच, असा संदेश शिवकुमार यांनी दिला. माता अमृतानंदमयी यांनी समाजसेवेसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या ध्यानाची आठवण करून देत, केरळमधून कर्नाटकात आलेल्या माता अमृतानंदमयी यांच्या पवित्र कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

Tags: