हुबळीत झोपेच्या गुंगीत वाहन चालवणाऱ्या एका पीएसआयने सार्वजनिक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले.
उमेशगौड नावाच्या पीएसआयने विद्यानगर परिसरात वाहनांना धडक देत अपघातांची मालिका घडवली. धडकेमुळे काही वाहनांचे नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पीएसआयला जाब विचारत त्यांच्याशी वाद घातला. पीएसआयने नागरिकांची माफीही मागितली.

दरम्यान, संबंधित पीएसआय दारूच्या नशेत असल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, या आरोपात तथ्य आहे की नाही, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि नागरिकांची समजूत काढली.


Recent Comments