बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात विकासकाम सुरू असताना जुन्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दुर्मिळ उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आढळली. या मूर्तीच्या दर्शनानंतर न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात नूतनीकरण व विकासकाम सुरू आहे. यावेळी जुन्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याजवळील माती हटविताना कामगारांना प्राचीन शैलीतील दगडी गणेशमूर्ती आढळली. झाडाच्या मुळांमध्ये ही मूर्ती असल्याचे दिसताच कामगारांनी काम थांबवून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली.


माहिती मिळताच बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकिलांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्याच झाडाखाली मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा, हार अर्पण आणि महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. न्यायालयाच्या परिसरात गणेशमूर्ती आढळल्याने वकील आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सर्वलोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक वीरेश हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments