Dharwad

धारवाडमध्ये ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलन; एसआयआर रद्द करण्याची मागणी

Share

बेंगळुरूपाठोपाठ धारवाडमध्येही काँग्रेसने ‘व्होट बचाव, देश बचाव’ आंदोलन छेडले. मतदार यादीतील एसआयआर प्रक्रियेला विरोध करत केंद्र सरकार आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात पक्षाने संताप व्यक्त केला.

धारवाड जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कलाभवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्रातील भाजप सरकार संवैधानिक संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापूर्वी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर केल्यानंतर आता एसआयआर प्रक्रियेद्वारे निवडणूक आयोगाचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मतदार यादीतून अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समाजातील मतदारांची नावे लक्ष्य करून वगळली जात असल्याचा दावा काँग्रेसने केला. ही प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Tags: