राज्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दूधदरवाढीच्या निर्णयाचे दूध उत्पादक संघांनी स्वागत केले आहे. यानिमित्त राज्य दूध महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची गृहकार्यालय कृष्णा येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
दूधदरवाढीचा निर्णय घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपल्याबद्दल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मंत्री लक्ष्मण सवदी, पुट्टरंगशेट्टी, आमदार के. वाय. नंजेगौडा, सी. पी. योगेश्वर, बमूलचे अध्यक्ष डी. के. सुरेश आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार जी. सी. चंद्रशेखर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील दूध उत्पादक संघांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला.



Recent Comments