State

चमोली हेलिकॉप्टर दुर्घटनेतील अरुण साळुंखे यांचे पार्थिव बेळगावात

Share

उत्तराखंडमधील चमोली येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बेळगावचे सीसीबी पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह पाच कन्नडिगांचे पार्थिव राज्यात दाखल झाले आहे.

३० ऑक्टोबर रोजी चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर ही दुर्घटना ओढवली होती. अपघातात मृतदेह जळाल्याने डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटविण्यात आली.

प्रताप, शंकर गौडा, सुधीर आणि नटराज यांचे पार्थिव रविवारी रात्री डेहराडून येथील जॉली ग्रँट विमानतळावरून विशेष विमानाने बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले.

बेळगाव विभागाचे सीसीबी पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांचे पार्थिव गोव्यात विमानाने आणण्यात येणार असून, तेथून रस्तेमार्गे त्यांच्या मूळ गावी बेळगावला पाठविण्यात येणार आहे.

सर्व पार्थिव सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे खासदार श्रेयस एम. पटेल यांनी सांगितले. सोमवारी सकाळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.

Tags: