Bellary

बसमधील चोऱ्यांप्रकरणी दोन महिला अटकेत; १७ लाखांचा ऐवज जप्त

Share

बसमध्ये प्रवाशांचे लक्ष विचलित करून दागिने आणि रोकड चोरणाऱ्या आंध्र प्रदेशातील दोन महिलांना बळ्ळारी एपीएमसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली.

रामपूरहून बळ्ळारीला येणाऱ्या बसमध्ये चित्रदुर्ग येथील यल्लम्मा यांच्या बॅगेतून १३५ ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये चोरीला गेले होते. तसेच ३ सप्टेंबर रोजी बळ्ळारी बसस्थानकात पार्वतम्मा यांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या होत्या.

या प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम येथे जाऊन भुवना वय ३५ आणि रूपा वय ३६ यांना अटक केली. त्यांनी चोरी केलेले दागिने आणि रोकड घरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी एकूण १७ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

Tags: