बळ्ळारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा तालुक्यात ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. धडकेनंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली.
सिरुगुप्पा तालुक्यातील बग्गूर क्रॉसजवळ हा अपघात झाला. शंभुलिंगप्पा आणि दुचाकीवर मागे बसलेले लोकप्पा हे दोघे सिरुगुप्पा येथून के. सुगूर गावाकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी दुचाकीच्या पेट्रोल टाकीला आग लागून काही क्षणांतच संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सिरुगुप्पा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments