अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार आणि सहमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यानंतर विद्यार्थ्यांनी नाडगीताचे सामूहिक गायन करून कर्नाटक मातेप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी कर्नाटकचा इतिहास, संस्कृती आणि कन्नड भाषेची वैशिष्ट्ये यावर मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या गायन, नृत्य आणि कर्नाटकच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. कन्नड भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, असे आवाहन मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना केले.
शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.


Recent Comments