Belagavi

काळ्या दिनासाठी बेळगावकडे निघालेल्या शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांना सीमेवरच रोखले

Share

बेळगावात काळा दिन पाळण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी निपाणी टोलनाक्यावर रोखून ताब्यात घेतले. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली.

बेळगाव प्रवेशावर जिल्हा प्रशासनाने घातलेली बंदी झुगारून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविले. या कारवाईमुळे सीमाभागात काही काळ तणाव निर्माण झाला.

याप्रकरणी विजय देवणे, विराज पाटील, प्रकाश पाटील, राजू यादव, विनोद खोत, सताप्पा नरके, अवधूत साळोखे, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, दीपाली घोरपडे, विशाल देवकुळे, सागर पाटील, विकास पाटील, सतीश पाणारी आणि सरदार टिप्पे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सीमाभागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Tags: