Bagalkot

बागलकोटमध्ये राज्योत्सव सोहळा; मंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Share

बागलकोट येथील नवनगरमधील जिल्हा क्रीडांगणावर ७१ वा कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री तथा लघुउद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर त्यांनी कन्नडांबेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. राज्यात जनआंदोलन सेवेला प्रारंभ करून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येत असून, विविध क्षेत्रांत विकासकामे हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी आकर्षक संचलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार पी. सी. गद्दीगौडर, राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे, आमदार उमेश मेटी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: