ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २ नोव्हेंबरला हिंडलगा कारागृहावर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते चून्नप्पा पुजारी यांनी केली.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी राज्यातील ३१ जिल्ह्यांतील शेतकरी २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता गुरलापूर येथे एकत्र येणार आहेत. दुपारी १२ वाजता शशिकांत गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली हिंडलगा कारागृहाकडे पायी मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असे पुजारी यांनी सांगितले.

ऊसाला योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देत, गोळीबार केला किंवा तुरुंगात डांबले तरी माघार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जेलमध्ये शेतकऱ्यांच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था करून ठेवण्याचे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि साखर कारखानदारांनी उद्या सायंकाळपर्यंत ऊसदरप्रश्नी अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकरी हिंडलगा कारागृहाकडे कूच करतील, असा इशारा पुजारी यांनी दिला.


Recent Comments