Khanapur

“तालुक्यातील २००एकरातील जळालेल्या उसाची तातडीने उचल करा, शेतकर्याचे तहसीलदाराना निवेदन”

Share

गेल्या महिण्याभरापासुन खानापूर तालुक्यात शार्टसर्किटमुळे उसाच्या फडाला आग लागुन जवळ पास २०० एकर जमिनीतील उस जळुन शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.अशा शेतकऱ्याच्या जळालेल्या उसाचे काय करायचे ? असा यक्षप्रश्न पडला आहे.

तेव्हा तालुक्यातील जळालेल्या २०० एकर जमिनीतील उसाची त्वरीततोडणी करून उचल करावी.व साखर कारखान्यानी उसाला गाळपासाठी प्रथम प्राधान्य द्यावे.अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील शेतकर्यानी शुक्रवारी दि.३० रोजी तहसीदाराना सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,खानापूर तालुक्यातील गणेबैल ,रामगुरवाडी, कान्सुली, गुंडपी आदी गावच्या२०० एकर शिवारातील ऊस शार्टसर्किटमुळे जळालेला आहे.या उसाची तातडीने साखर कारखाण्यानी उचल करावी व जळालेल्या उसाला आदी प्राधान्य द्यावे.याकडे दुर्लक्ष केले तर उसाचे वजन घटुन शेतकर्यानी आर्थिक भुर्दडसहन करावा लागेल, कारण यंदा पावसाची कमतरता पडल्याने पिकांचे नुकसान व चार्याची टंचाई शेतकर्याना भासनार आहे.

तेव्हा शेतकर्याच्या जळालेल्या उसाला आदी प्राधान्य देऊन साखर कारखाणा व्यवस्थापकानी याकडे तातडीने लक्ष द्यावे ,अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना भाजपचे राज्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी, रेव्हणसिध्दया हिरेमठ, जोतिबा घाडी,रामा कालमणकर,टोपाणा कालमणकर,गेणापा कालमनकर ,रामु गुरव, संजू गुरव, बाळू गुरव, मारूती गुरव, निंगापा गुरव, पांडुरंग गुरव ,मनोहर निलजकर, सातेरी गुरव, शिवराम पाटील, सुधीर गघाडी,नारायण घाडी, मल्लापा मोटर, फकिरा धबाले,शंकर गावडा सह खानापूर, कान्सुली, आलोळी, गणेबैल, बाचोळी, रामगुरवाडी,ढोकेगाळी आदी गावचे शेतकरी उपस्थित होते.

Tags: