खानापूर येथे महर्षी वाल्मिकी जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेले स्थानिक आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
खानापूर येथे आयोजित कार्यक्रमात महाकाव्य रामायणाचे रचनाकार आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीला आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुष्पहार अर्पण करून नमन केले. याप्रसंगी बोलताना आमदारांनी सांगितले की, सत्य, धर्म आणि उच्च विचारांचा मार्ग जगाला दाखवणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचे जीवनमूल्य आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत. याच पावन प्रसंगी त्यांनी संपूर्ण खानापूर मतदारसंघातील नागरिकांना वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच महर्षींचे विचार प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले.



Recent Comments