खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड ग्रामपंचायतीमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत विकास अधिकारी आदम अली जलगेरी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले आणि त्यांच्या महान विचारांचे स्मरण केले.

नंदगड ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना पीडीओ आदम अली जलगेरी म्हणाले की, महाकाव्य रामायणाची रचना करणाऱ्या महर्षी वाल्मिकींचे मूळ नाव रत्नाकर असे होते. काळाच्या ओघात आलेल्या अनुभूती आणि आत्मज्ञानातून त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला. प्रत्येकाने वाल्मिकींच्या विचार, सत्य आणि ज्ञानाची तत्त्वे दैनंदिन जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन करत त्यांनी महर्षी वाल्मिकींच्या जीवनचरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कोप्पदमठ, मंजुनाथ जकने, श्रीधर नंदगडकर, महेश मादार, गणाचारी यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्त्या व इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments