पतंग उडवण्याच्या मौजमजेसाठी वापरला जाणारा घातक नायलॉन मांजा आता आकाशात भरारी घेणाऱ्या निष्पाप पक्ष्यांसाठी काळ ठरत आहे. बेळगावमधील वडगाव येथे घडलेल्या दुर्घटनेवरून ही बाब पुन्हा एकदा समोर आली असून, पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
बेळगावातील वडगाव येथील चावडी गल्ली परिसरात नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या एका पक्ष्याला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचाव पथकाने यशस्वीपणे सुरक्षित बाहेर काढले. शहरात अधिकृत बंदी असतानाही शाळकरी मुले व तरुण पतंग उडवण्यासाठी या प्राणघातक मांजाचा सर्रास वापर करत आहेत. यामुळे मानवी सुरक्षेसोबतच रोज शेकडो मुक्या पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. अशा निष्पाप जिवांचे बळी घेणाऱ्या बेकायदेशीर मांजा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रशासनाची कडक कारवाई अत्यंत गरजेची बनली आहे.



Recent Comments