खानापूर तालुक्यातील कापोली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या उभारणीसाठी माजी आमदार तथा बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
कापोली गावात प्रगतीपथावर असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांनी १ लाख रुपयांची मदत जाहीर करून तसा धनादेश मंदिर समितीच्या प्रमुखांकडे सोपवला. धार्मिक केंद्रे ही समाजात शांतता, सलोखा आणि सद्भावना वाढवणारी केंद्रे असतात, त्यामुळे अशा पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. अरविंद पाटील यांच्या या आर्थिक मदतीबद्दल ग्रामस्थ व मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.



Recent Comments