Bagalkot

बागलकोट जिल्ह्यात सशस्त्र आणि मास्कधारी चोरांकडून शेळ्या-मेंढ्यांची चोरी

Share

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्यातील यल्लट्टी गावात रात्रीच्या वेळी शेतात घुसून सशस्त्र आणि मास्कधारी चोरट्यांनी शेळ्या-मेंढ्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मेंढपाळ शशिकांत भजंत्री यांच्या गोठ्यात हा चोरीचा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आपल्या उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्यांचे पालनपोषण करणाऱ्या शशिकांत भजंत्री यांच्या गोठ्यातून यापूर्वीही दोन-तीन वेळा चोरी झाली होती. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे हवालदिल झालेल्या मालकाने सुरक्षेसाठी गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा बसवली होती. मात्र, चोरट्यांनी गोठ्याचे तारेचे कुंपण कापून आत प्रवेश केला आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत शेळ्या पळवून नेल्या.

या घटनेबाबत बोलताना शेतकरी शशिकांत भजंत्री यांनी, शेजारच्या शेतातील व्यक्तीनेच ही चोरी केली असल्याचा थेट आरोप केला आहे. याबाबत रबकवी-बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या शेळ्या-मेंढ्या पळवणारी टोळी सक्रिय असून रात्रीची गस्त वाढवून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Tags: