Belagavi

बेळगाव एपीएमसी मार्केटमधील गैरव्यवहाराविरोधात उपलोकायुक्तांकडे सुजीत मुळगुंद यांची तक्रार

Share

बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये ‘संडे मार्केट’च्या नावाने चालणाऱ्या अनधिकृत हालचाली आणि सरकारी महसुलाच्या नुकसानीबाबत सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी उपलोकायुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

बेळगाव एपीएमसी आवाराची पाहणी केल्यानंतर सुजीत मुळगुंद यांनी उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांना तक्रार अर्ज सादर केला. जय किसान भाजी मार्केटमधून स्थलांतरित झालेल्या व्यापाऱ्यांना केवळ तीन महिन्यांसाठी तात्पुरती सोय करून देण्यात आली होती. मात्र, कोणतेही भाडे न भरता गेल्या वर्षभरापासून हा अनधिकृत व्यापार सुरू असून यामुळे सार्वजनिक महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. एपीएमसी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचा महसूल बुडत असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच दररोजचा मार्केट सेस योग्य प्रकारे गोळा केला जात नसून शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर कमिशन वसूल केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेल्या एपीएमसी अधिकाऱ्यांवर कडक चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजीत मुळगुंद यांनी केली आहे.

Tags: