विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील हेब्बाळ गावात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कापणीला आलेला पाच एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकरी कमलाप्प पट्टणशेट्टी यांचे नुकसान झाले आहे.

कर्ज काढून उसाची लागवड केलेल्या पट्टणशेट्टी यांच्या शेतात ही घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ऊस जळून गेला.


हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या नुकसानीबद्दल शेतकरी कमलाप्प पट्टणशेट्टी यांना हेस्कॉम विभागाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments