Vijayapura

कन्नड साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी महिलेला संधी द्या

Share

कन्नड साहित्य परिषदेच्या १११ वर्षांच्या इतिहासात आजवर महिलेला राज्याध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे राज्याध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. विजयलक्ष्मी बाळेकुंद्री यांनी विजापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

कन्नड शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकारी शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी त्यांनी केली. शाळा-महाविद्यालये दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कन्नड भाषेविषयी अभिमान निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘आमची वाट कन्नड शाळांकडे’ या ध्येयवाक्याखाली सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यावती अंकलगी यांनी कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी परिषदेच्या राज्याध्यक्षपदी महिलेला संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येकाने घरात कन्नड बोलावे आणि मुलांना कन्नड शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला डॉ. भुवनेश्वरी सासनूर, प्रीती पत्तार, शकुंतला मोसलगी, जयश्री कुलकर्णी, उमा गडेद, सविता गलगली आणि सरस्वती उपस्थित होत्या.

Tags: