बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यातील बाडगंडी गावात रेशनचा तांदूळ बेकायदा साठवून वाहतूक करण्याचा प्रयत्न अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला. या कारवाईत ४२० किलो तांदूळ आणि गुड्स ऑटो जप्त करण्यात आला असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बीळगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

बाडगंडी गावातील अगसीजवळ अन्न विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. बसवन बागेवाडी येथील शिवानंद मनगुळी हा गरजूंसाठी वितरित करण्यात येणारा रेशनचा तांदूळ अनधिकृतपणे साठवून गुड्स ऑटोमधून वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असताना आढळला.

अधिकाऱ्यांनी दहा पेक्षा अधिक प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेला एकूण ४२० किलो तांदूळ जप्त केला. या तांदळाची किंमत अंदाजे ९ हजार ७४४ रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला गुड्स ऑटोही जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


Recent Comments