विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ बस स्थानकात प्रवाशांनी भरलेली बस अचानक चालकाविना मागे धावल्याने एकच खळबळ उडाली. बस स्थानकाच्या डेपो गेटला जाऊन धडकल्यामुळे मोठा अपघात टळला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ बस स्थानकात प्रवाशांना घेऊन उभ्या असलेल्या बसचा चालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर वाहक (कंडक्टर) ड्युटी नोंदवण्यासाठी गेला होता. यादरम्यान बस अचानक मागे धावू लागली. हे दृश्य पाहून बसमधील प्रवाशांसह स्थानकावरील नागरिकांची धांदल उडाली.


मागे धावणारी बस थेट डेपोच्या प्रवेशद्वाराला धडकून थांबली. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका महिला प्रवाशाने चालकाच्या दरवाजातून आत प्रवेश करताना नकळत क्लचवर पाय दिल्याने बस मागे घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस हलताच घाबरलेली महिला खाली उतरून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.


Recent Comments