Belagavi

वडगावात ‘नरवीर रासलीला’ दुर्गा दरबाराचा वर्धापन दिन उत्साहात

Share

बेळगावच्या वडगाव येथील कारभार गल्लीत प्रसिद्ध ‘नरवीर रासलीला दांडिया ग्रुप’च्या वतीने आयोजित ‘आदिशक्तीची आराधना दुर्गा दरबार’ यंदा ३० व्या वर्षात पदार्पण करत असून याचे औचित्य साधून महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


वडगावच्या कारभार गल्लीतील नरवीर रासलीला मंडळाने ३० वर्षांची यशस्वी परंपरा पूर्ण केल्याबद्दल या विशेष महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसंगी परिसरातील सुमारे ७ ते ८ हजारांहून अधिक भाविकांनी श्री देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज सायंकाळी धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.


मंडळाचे अध्यक्ष अभि सावंत आणि उपाध्यक्ष प्रवीण बाळेकुंद्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच कारभार गल्लीतील समस्त कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा नवरात्रोत्सव व महाप्रसाद सोहळा सुरळीत पार पडला.

Tags: