Belagavi

आमदार असिफ सेठ यांचा वाढदिवस उत्साहात

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ सेठ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

शहरातील वैभव नगर येथील आमदार कार्यालयात विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.


सकाळपासूनच कार्यालयात समर्थकांची गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी आमदारांचे बंधू तथा माजी आमदार फिरोज सेठ उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


आमदार असिफ सेठ यांनी कोविड आणि टाळेबंदीच्या काळात अनाथ व गरजूंना अन्नधान्य तसेच वैद्यकीय मदत पुरवली होती. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी उत्तर मतदारसंघात रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर दिला आहे. आमदारांकडून आजवर झालेल्या सत्कार्याचे नागरिकांनी यावेळी कौतुक करत आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Tags: