बेळगावजवळील कणबर्गी येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा २०२८ मध्ये साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर मंदिराच्या प्रांगणात पंच कमिटी आणि ग्रामस्थांची विशेष बैठक पार पडली.

बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त धार्मिक विधी आणि नियमांचे पालन ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत केले जाईल. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता विशेष मिरवणूक काढली जाणार असून दुपारी २ वाजेपर्यंत म्हैस अर्पण करण्याचा विधी पार पडणार आहे.
त्यानंतर दुपारी ३ वाजता पारंपरिक शास्त्रपूजा (सुतार समाज) आणि सायंकाळी ४ वाजता समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत शमी (बन्नी) वृक्षाचे पूजन करून धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.

या बैठकीस भैरगौडा पाटील, मुरुगेंद्रगौडा पाटील, बाबासाहेब पाटील, संजय इनामदार, यशवंत जानाई, महेश मलाई, सिद्धगौडा पाटील यांच्यासह पंच कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments